गडचिरोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटना मध्ये तिघांचे मृत्यू

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा धक्का लागून तिघांचे मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
उमेश काशिनाथ काटेंगे वय 30 वर्षं रा. कुंभीटोला ता.. कुरखेडा, नंदा पुंडलिक नैताम वय 60 व अंजना गोपाळा राऊत वय 65 दोन्ही राहनार गोकुळनगर गडचिरोली अशी मयतांची नावे आहेत
कुंभीटोला येथील उमेश काटेंगे ह्यांची कुंभीटोला येथील सती नदिच्या काठावर शेती आहे आज सकाळी 10 वा. चे सुमारास धानाच्या रोवनी करीता पाणी पुरवठा करण्यासाठी नदिपात्रातील मोटारपंप गेला असता मोटारीला स्पर्श करताच विजेचा धक्का बसला व तो बेशुद्ध पडला शेतशिवारातील नागरिकांनी उमेश ला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.त्यांच्या पत्शात पत्नी व तिन मुली आहेत घरातील कर्ता पुरुषांच्या निधनाने कुटूंब पोरके झाले आहे.
दुसऱ्या घटनेत गडचिरोली तालुक्यातील मुळझा येथील वैनगंगा नदी काठावरील शेतात रोवनीच्या कामाला गोकुळनगरातील काही महिला जात असताना जिवंत विज तारांना स्पर्श झाल्याने नंदा नैताम व अंजना राऊत जागिच गतप्राण झाल्या. या घटनेची माहिती होताच गोकुळनगर गडचिरोली मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अधीक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.