खापरखेड्यातील नविन बिना भानेगाव मध्ये आढळले ३ कोरोना पाँजिटीव लाँक डाऊन तोडुन वास्तुक कार्यक्रम त्यामुळे कोरोना चा झाला संसर्ग

935

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

भानेगाव / खापरखेडा :२३ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील भानेगाव येथील नविन बिना वार्ड क्रमांक १ मध्ये लाँक डाऊन तोडुन घराचे वास्तुक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आज ३ जण कोरोना पाँजिटीव निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वार्ड क्रमांक १ येथील ३५ वर्षिय युवक, त्याची आई वय ६२ वर्षे तसेच त्या युवकाची मुलगी १० वर्ष असे ३ जण कोरोना पाँजिटीव आढळले आहे. लाँक डाऊन मध्ये शिथिलता मिळाल्याचा गैरफायदा उचलत या युवकाने सोमवारी आपल्या घराचे वास्तुक कार्यक्रम आयोजित केले होते अशी माहिती ग्रा पं. प्रशासनाला मिळताच ग्रा पं. सरपंच रवीभाऊ चिखले तसेच सचिव शेंबेकर यांनी चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात या लोकांची कोव्हीड १९ ची स्वैब टेस्ट केली त्यात या कुटुंबातील आई, मुलगा, व नातीन हे तिघेही पाँजिटीव निघाल्याचा रिपोर्ट आज आला मात्र या कुटुंबातील सुन निगेटिव्ह असल्याचे समजते.
मागील सोमवारी या व्यक्तीच्या घरी आयोजित वास्तुक कार्यक्रमात नागपूर हुन १५-२० जण सहभागी झाले होते तसेच वार्ड क्रमांक १ मधील एकुण ४२ जण(७कुटुंब) सहभागी झाले होते अशी माहिती भानेगाव सरपंच रवीभाऊ चिखले यांनी दखल न्यूज भारत पोर्टल चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांना दिली. त्यानंतर कडक पावले उचलत ग्राम पंचायत भानेगाव ने या परिवाराची कोव्हीड टेस्ट केली.
या परिवाराच्या थेट संपर्कात असणारे १० हाय रिस्क, तसेच ४४ लो रिस्क नागरिक असल्याचे समजते. भानेगाव नवीन बिना वार्ड क्रमांक १ मध्ये एरिया सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असुन घटनास्थळी नायब तहसीलदार, सावनेर, चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पेटकर मैडम्, ग्रा पं. सचीव शेंबेकर, सरपंच रवीभाऊ चिखले पोहोचले असुन उद्या लाँक डाऊन चे उल्लंघन करुन घरी वास्तुक कार्यक्रम आयोजित करुन गर्दी जमवली तसेच कोरोना चा संसर्ग पसरविला म्हणून या परिवाराच्या विरोधात कलम १८८ अन्वये खापरखेडा पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ग्रा पं. सरपंच रवीभाऊ चिखले यांनी दखल न्यूज भारत ला दिली आहे.