कोरोना संकटकाळात उपयोगी वस्तूचे वाटप करून साजरा केला वाढदिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिपळूणचा आदर्श उपक्रम

128

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : जगात सुरू असलेल्या कोरोना या महामारीमुळे देशावरती मोठे संकट उभे राहिले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या उपाय योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर आणि चिपळूण शहर अध्यक्ष आशिष खातू यांच्या पुढाकाराने परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण व जिद्द मतिमंद शाळा येथे टेंपरेचर मीटर, पल्स मीटर, सॅनिटायजर स्टँड इत्यादी महत्वाच्या वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ. वैशाली निमकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, नगरसेवक परिमल भोसले, शहर सरचिटणीस श्रीराम शिंदे, निष्ठावंत कार्यकर्ते मा. जतिनजी घटे, परांजपे हायस्कूल चे प्राचार्य सुभाष जाधव, जिद्द शाळेचे प्राचार्य प्रदिप दिवाडकर, युवा कार्यकर्ते मंदार कदम तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*