गडचिरोली जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला

251

 

संपादक जगदीश वेन्नम

गडचिरोली:जिल्हयात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पुढेही लागूच राहणार आहेत. यामध्ये जिल्हयाबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश जिल्हयात होवू दिला जाणार नाही. यामूळेच गेल्या काही आठवडयांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून प्रशासनाला कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे. जिल्हयात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणांहून येत असतात. मात्र यावेळी ते कोरोना बाधित क्षेत्रामधून कर्तव्य पार पाडून जिल्हयात दाखल झाले. आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते. प्रशासन सुरक्षा दलाच्या जवानांबाबत आवश्यक खबरदारी घेत आहे. गडचिरोली शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतू कोरोना संसर्ग होवू नये म्हणून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी.