वनविभागाने तेंदूपत्ता च्या 2015 च्या हंगामाच्या मजुरांच्या याद्या न पुरवल्याने तेंदुपत्ता बोनस वितरणास नगर पंचायतीला अडचण

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 23 जुलै नगरपंचायतीच्या हद्दीत पन्नाभटी एक व कोरची मध्ये दोन अशा तेंदूपत्ता खरेदीच्या फळे असतात 2015 मध्ये तेंदूपत्ता चे लिलाव वन विभागाने केले होते त्यावेळेस वन विभागाने तेंदुपत्ता बोनस देण्यास दिरंगाई केली तेव्हा कोरची नगरपंचायतीने वारंवार तक्रारी करून तेंदुपत्ता बोनस ची मागणी केली. तेंदुपत्ता बोनस ची रक्कम नगरपंचायतीच्या ग्राम समितीमध्ये जमा केली पण मजुरांच्या याद्या चुकीच्या दिल्यामुळे तेंदुपत्ता बोनस वाटपास अडचण निर्माण झालेली आहे तरी वनविभागाने तेंदुपत्ता संकलन केलेल्या मजुरांच्या 2015 च्या ए वन नुसार नगरपंचायतला पुरवठा करण्याची मागणी नगरपंचायत चे मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी बेडगाव यांना विंनती करूनही वन विभागाने तेंदुपत्ता संकलन केलेल्या मजुरांचा याद्या पुरवठा करीत नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
कोरची नगरपंचायतने वन विभागाला 2019 पासुन तेंदुपत्ता संकलन केलेल्या मजुरांच्या याद्या पुरवठा करण्यासाठी वारंवार विनंती करूनही पुरवठा केला जात नसल्याने तेंदुपत्ता मजूर अडचणी निर्माण झालेल्या आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे तेंदूपत्ता बोनस पासून कोरची नगरपंचायत क्षेत्रातील मजूर गेल्या चार वर्षापासून वंचित आहेत. त्यामुळे वनविभागाने तेंदूपत्ता हंगाम 2015 च्या अद्यावत याद्या तात्काळ पुरवठा करण्याची मागणी नगरपंचायत चे मुख्याधिकारी 23 जुलैला पत्र पाठवून मागणी केली आहे. जर दोन दिवसात अध्यावत याद्या पुरवठा न केल्यास तेंदूपत्ता मजूर व ग्राम सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.

वनपरिक्षेत्राधिकारी भोसले यांचेशी संपर्क साधले असता याद्या तयार करून तात्काळ देण्याचे आदेश दिल्याचे समजते.