कोरोना रुग्ण बरे होण्यात गोंदिया महाराष्ट्रात अव्वल; जिल्हयाचा कोरोना रिकव्हरी रेट 90 टक्के तर मृत्यु दर 1.25 टक्के

180

 

बिंबिसार शहारे (9545776378)
वि.जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज

गोंदिया दि.23/07/2020:
देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हयात देखील त्या प्रमाणात कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येत आहे. तरीसुद्धा गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्हयात आज 23 जुलै रोजी एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 239 असून त्यापैकी 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा रुग्णांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले होते.यातील एक रुग्ण नागपूर येथून बरा होऊन घरी परतल्यामुळे एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 214 झाली आहे.
आज 23 जुलै रोजी गोंदिया जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.5 टक्के इतका असून महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भूषणकुमार रामटेके यांनी दिली.
गोंदिया जिल्हा राज्याच्या टोकावर असून मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या सिमेला लागून आहे. त्यामुळे कोरोनाविरुध्दचा लढा या जिल्हयासाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रशासनात काम करणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळाची कमतरता असूनही अतिशय मेहनत घेऊन हे कार्य केले आहे. आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महसुल विभाग तसेच इतर महत्वाच्या विभागांनी विशेष नियोजन करुन दक्षता घेऊन काम केले आहे.
बाहेर राज्यातून किंवा जिल्हयातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिस आणि आरोग्य विभागाची नजर आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ताबडतोब संपर्क तपासून करून त्यांची माहिती घेणे देखील महत्वाचे कामे आहेत. तसेच संशयीतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे किंवा गृह विलगीकरण करणे या गोष्टींचे नियोजन महत्वाचे ठरले आहे. यानंतर रुग्णांवर त्वरित उपचार करणे, कंटेंटन्मेंट झोनमध्ये एक्टीव्ह सर्वे करुन आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे असलेल्या नागरिकांची तसेच 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींची देखरेख, फिव्हर क्लीनीकमध्ये येणाऱ्या नागरिकांचा पाठपुरावा आदी बाबींमुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.5 टक्के असून यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून 239 पैकी 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील प्रयोगशाळा चाचणी अहवालात बाधित 230 तर रॅपिड अँटिजेन चाचणीत पाच रुग्ण आढळले. जिल्ह्यातील चार रुग्णांची बाहेर जिल्ह्यात व राज्यात झाली. यामध्ये तीन रुग्णांची चाचणी नागपूर येथे तर एका रुग्णाची चाचणी बंगलोर येथे करण्यात आली आहे. या चारही रुग्णांचा समावेश जिल्ह्यात करण्यात आल्यामुळे एकूण बधितांची संख्या 239 इतकी झाली आहे.
कोविड-19 कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अव्वल असून जिल्हावासियांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. जिल्हयात 27 मार्च 2020 रोजी पहिला पॉजिटीव्ह रुग्ण आढळला होता. एप्रिल महिन्यात तो रुग्ण बरा होऊन घरी परतला. त्यानंतर मे 2020 या महिन्यात प्रवाशी नागरिकांमुळे एकुण 64 पॉजिटीव्ह रुग्ण आढळले. 37 कोरोना बाधित रुग्ण मे महिन्यात बरे होऊन घरी परतले. जुन महिन्यात 84 नविन पॉजिटीव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे त्याचा ताण जिल्हा प्रशासनावर आला. यादरम्यान 67 रुग्णांना कोरोनापासून मे महिन्यात मुक्ती मिळाली. जुलै महिन्यात आजपर्यंत सर्वात जास्त 90 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.
या महिन्यात आतापर्यंत एकुण 109 रुग्ण कोरोनावर मात करुन ते रुग्ण उपचारातून बरे होऊन घरी परतले.
एकुण 239 पैकी 6 रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे भरती करण्यात आले. एक रुग्ण उपचारातून बरा होऊन घरी परतला. जुलै महिन्यात आतापर्यंत 3 रुग्ण कोरोनावर मात करु शकले नाही आणि त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हयातील नागरिकांना आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास तात्काळ त्यांनी आरोग्य हेल्पलाईन क्रमांकावर 8308816666/8308826666 संपर्क करावा किंवा प्रशासनाला या बाबतची माहिती दयावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.