मेंढपाळावरील अत्याचार, हल्ले थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू,निवेदनाव्दारे दिला इशारा

 

वाशिम(फुलचंद भगत)- मेंढपाळावरील अत्याचार हल्ले यावर तात्काळ प्रतिबंद घालुन ‘विशेष कायद्याची’ तरतुद करून ‘गावगुंड व जंगली स्वापदापासून’ स्व:रक्षणार्थ “बंदूक शस्त्र” परवाने मिळणे बाबत व विविध मागण्या संदर्भात
आज धनगर समाज युवा मल्हार सेना व धनगर समाज बांधवाच्या वतिने तहसिलदार, तहसिल कार्यालय मंगरूळपीर मार्फत विलास लांभाडे पं स उपसभापती, ज्ञानेश्वर शा.मुखमाले राज्यसचिव धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्रराज्य संतोष लांभाडे ,ऊमेश गायके,सतिष लांभाडे, सुमित मेटकर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व धनगर सामाजिक संघटना व जमात बांधव १५ जूलै २०२० पासून विद्यमान मा.पंतप्रधान व मा मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे अवगत करत आहे की, महाराष्ट्र व इतर राज्यातील मेंढपाळावरील गावगुंडाकडून अन्याय, अत्याचार व हल्ल्यांचे प्रकार दिवसागणिक वाढत असून मेंढपाळांचे जीवन जगणं दुरापास्त झालेले आहे.मागील सन २०१९ पासून तर आज पावेतो खालील काही अमानुष घटना धनगर समाज युवा मल्हार सेना शासनाच्या निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिल्या

१) कोहाकडी ता.पारनेर जि.अहमदनगर येथील मेंढपाळ व महिलांना मारहाण व त्यांच्या वरच उलट गुन्हे दाखल.
२) हडसूने ता.जि.धूळे येथील मेंढपाळास २०/२५ गावगुंडानी घरात घुसून मारहान.संसारोपयोगी साहित्याची मोडतोड ..
३) जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या ताई मेहत्रे देवणी तळेगाव भोवणी ३० मार्च २०२० ची घटना यांची शेताच्या वादातुन जाळून हत्या

४) चिंतामण ठेल्लरी हप्ते देत नाही म्हणून वनरक्षकाची बेदम मारहाण जूने कोरदे ता.शिंदखेड जि.धुळे
५)जवखेड ता.शिरपूर जि.धुळे येथील गावगुंडानी ७ मेंढपाळांना जबर मारहाण करून ३५ मेंढ्या मारू टाकल्या
६) औरंगाबाद येथील तळ्यावर मेंढरांना पाणी पाजलं म्हणून महिलेवर कु-हाडे ने जीवघेना हल्ला
७)कोल्हापुर येथील रूकडी गावात आख्खी धनगर वस्ती जाळून खाक केली
८)घोडेगाव ता.मुक्तानगर जि.जळगांव गावगुंडानी १२० मेंढ्या ट्रकात पळवून नवविवाहित मुलीवर बलत्कार केला

९)अमळनेर तालुक्यात लकडे नावाच्या मेंढपाळास अमान्षपणे हातपाय तोडून व डोळे काढून खून केला

१०)ढवळपूरी येथील धनगर कोकणकडे जातांना ढवळपूरी येथील ट्रक ड्राइवर ने २५० मेंढ्या चिरडून मेंढपाळांचा संसार मातीत घातला..
११) मागील वर्षी मौजे पाटस ता.दौंड जि.पूणे येथील रावा शिवा नरूटे यांच्यावरील हिंगणी ता. करमाळा जि.सोलापूर येथील बाबर नामक व्यक्ति कडून झालेल्या प्राणघातक हल्ला व त्यातुन त्यांचा नुकताच झालेला मृत्यू ..
१३)बेलवंडी तालुका श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे मेंढपाळांना लोखंडी राॅड व लाथा बुक्कांनी केलेली बेदम मारहाण
१४) चंद्रपूर येथील मेंढपाळांच्या पूरात वाहून गेलेल्या १०२४ मेंढ्या चा शासकीय मोबदला मिळणे.
वरील घटनांचा आम्ही निषेध करतो व खालील मागण्या निवेदनाद्वारे मांडतो..
१५) १५ जूलै २०२० ला जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात नुकतीच मेंढपाळ धनगर माजी सरपंच यांना बेदम मारून हात फॅक्चर केला..
१)गावगुंडाच्या या वाढत्या अन्याय, अत्याचार, हल्ले व नैसर्गिक अपत्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी मोक्का, मिसा, पोटा अश्या “विशेष कायद्याची” तरतुद करावी.. २)चराईसाठी वने आरक्षित करून चराई पासेस द्याव्यात.
३) भटक्या मेंढपाळांवरी वरील गंभीर गुन्हांची नोंद घेऊन “गावगुंड व जंगली स्वापदापासून” स्व: रक्षणार्थ “बंदूक शस्त्र” परवाने मिळावे.
४) मेंढपाळावरील खोटे गुन्हे मागे घ्यावीत.हल्यात मृत्यू मुखी पडलेल्या घटनेतील आरोपीवर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावी..
५)मेंढपाळांना बंदिस्त शेळी मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहान देण्यासाठी जमीनीसह कायमस्वरूपी किमान २५लाखा पर्यन्त भरीव आर्थिक अनुदान व्यवस्था करावी..
अन्यथा धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाही मार्गांनी जन आनंदोलने करू..या दरम्यान काही अघटीत घडल्यास शासन व प्रशासन जबाबदार असेल असे शासनाच्या निदर्शनास आणून देतो असे निवेदन तहसिलदार यांना देन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835