महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिन निमित्त दापोलीतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

107

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोना (कोविड – 19) जनजागृतीच्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ता.दापोलीच्या वतीने 58 वा वर्धापन दिन कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आला. दरवर्षी समाज पूरक व बालकेंद्रीत उपक्रमांनी सजलेल्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, माञ यावर्षी राज्यात कोरोना महामारीमूळे उद्धवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणा-या योद्ध्यांना सदरचा वर्धापन दिन समर्पित करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कासारे व सरचिटणीस जावेद शेख यांनी घेतला होता.
दापोली तालुक्यात कोरोनामूळे उद्धभवलेल्या परिस्थितीशी यशस्वीपणे सामना करत समाजात कोरोना विरूद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण करणारे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील, पं.स.सभापती रऊफ हजवानी, उपसभापती ममता शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, दापोली न.पं नगराध्यक्षा परवीन शेख, मुख्याधिकारी कविता बोरकर, गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक विनोदकुमार रामपूरे, जालगांव सरपंच श्रृती गोलांबडे, तालुका आरोग्य अधिकारी शिवा बिरादार तथा उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य अधिकारी महेश भागवत यांना त्यांच्या कार्यालयात जावून कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्या बाबतचे सन्मानपञ देवून त्यांच्या यथोचित गौरव करण्यात आला.
कोरोना परिस्थिती निर्माण झाल्या पासून शिक्षकांनीही समाजिक भान बाळगत कोविड – 19 अंतर्गत कोविड सर्वेक्षण, पोलिस मिञ, विलगीकरण कक्ष, स्वस्त धान्य दुकान इ. सेवा स्विकारत कोरोना विरूद्धच्या लढ्यात प्रशासनास भक्कम साथ दिली अशा सुमारे 300 शिक्षकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपञ देवून गौरव करण्यास सुरूवात झाली आहे.
कोरोना विरूद्धच्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणू आणि सामान्यजनांत भक्कम भिंत बनून उभे असलेल्या सच्च्या करोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेतल्या बद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ता.दापोलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक वाळंज, अंकुश गोफणे, मंगेश कडवईकर, रामकृष्ण लिंगायत, सुग्रीव गुट्टे, माधव तिरूके, स्वप्निल परकाळे, ज्ञानेश्वर कासार, विश्वजीत सावंत, तिमसेकर आदींनी परिश्रम घेतले.

दखल न्यूज भारत