प्रधानमंत्री पिक विमा योजनेंच्या माहिती देणाऱ्या रथाला सभापतीनी दाखवले हिरवी झेंडी  ▪️अहेरीचे प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी दाखवली हिरवी झेंडी…

164

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुडडीगुडम : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० गडचिरोलीत जिल्हात राबविन्यात येत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी इफको टोकियो इन्शुरेन्स कम्पनी च्या माध्यमतून तयार करण्यात आलेल्या प्रचार वाहनाला अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमतून जास्तीजास्त शेतकऱ्यांना यात सहभाग घेता यावा या उद्देशाने अहेरी तालुक्यांतील गांवात अडिओ किल्प द्वारे योजनेची प्रसार प्रसिध्दी करण्यात येणार आहे.या योजनेत सहभाग होण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घ्यावा,असे आव्हान सभापती श्री भास्कर तलांडे,यांनी केले आहे.नैसर्गिक आपती,किड आणि रोगासारख्या अक्लपीत प्रतिकूल परिस्थितीमुळे पिंकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे,पिंकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठिन परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक उंची आबधित राखणे,शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञन व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.आदिसाठी शेतकऱ्यांना पीक विमाच्या लाभ होणार आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऎछींक आहे.खातेदारानांच्या व्यतिरिक्त कुळांने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहेत.
सदर वाहना रवाना करतांना उपविभागीय कृषि अधिकारी सुरेश जगताप तालुका कृषि अधिकारी दिपक कांबळे,मंडळ कृषि अधिकारी संदेश खरात व कृषि विभागाचे कृषिसेवक व कर्मचारी उपस्थित होते.