माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्याकडून गोतोंडी येथील नलवडे कुटुंबाचे सांत्वन.

422

 

 

निरा नरसिंहपुर दिनांक 23 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार, 

गोतोंडी ता. इंदापूर येथील संतोष अंकुष नलवडे, वय 33 या युवकाचे विजेच्या धक्क्याने निधन झाले होते. नलवडे कुटुंबावर हा मोठा आघात झाला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गोतंडी येथे जाऊन नलवडे कुटुंबाचे सांत्वन केले.

गोतोंडी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अंकुश नलवडे यांचा संतोष हा एकुलता एक मुलगा होता. संतोषच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नलवडे कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160