कन्हान मध्ये दररोज मिळताहेत कोरोना पाँजिटीव पेशंट ; प्रतिबंधित क्षेत्रात ड्युटी लावलेले कन्हान नगरपरिषद व कन्हान पोलीस कर्मचारी आहेत गायब

243

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कन्हान / नागपुर: २३ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोरोना चे हाँट स्पाँट बनलेल्या कन्हान नगर परिषद अंतर्गत दररोज पेशंट मिळत आहेत. परंतु तेथील प्रतिबंधित क्षेत्रात ड्युटी लावलेले कन्हान नगर परिषद चे कर्मचारी तसेच कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी गायब आहेत. काय याकडे कन्हान पिंपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी तसेच कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचे दुर्लक्ष होत तर नाही ना असा प्रश्न आता कन्हानवासियांना पडला आहे.
वार्ड नं ७ पटेल नगर पिपरी कन्हान मध्ये 12 कोरोना बाधित पॉजिटिव मिळाल्यानंतरही प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. ज्या भागात कोरोना पेशंट मिळत आहे तिथे एरिया सिल केला पण तेथील कंटोनमेंट झोनमधील मुर्ख नागरिकांनी बैरिगेड तोडून त्यांचा मुक्त संचार सुरु आहे. ना येथील जनता प्रशासनाचा आदेश पाळत आहेत? ना तिथे कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी ना ही कन्हान नगर परिषद चे कर्मचारी बंदोबस्तात दिसत आहेत? त्यामुळे आता या कंटोनमेंट झोन कडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष तर केले नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
त्यामुळे कोरोना च्या उद्रेकास रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? नागपुर जिल्हाधिकारी तसेच नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणा कडे लक्ष द्यावे अशी तेथील नागरिकांची मागणी आहे.