. न.प. ने मारुतीमंदिर स्टेडियम समोरील डॉ. करमरकर यांच्या कंपाऊंडला लागून ६ (चबुतरा) मोकळी जागा भाड्याने न देता पार्किंग साठी वापरावी जिल्हाधिकारी यांच्याकडे रामकांत आयरे यांनी केली मागणी

151

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम समोरील डॉ. करमरकर यांच्या कंपाऊंडला लागून ६ (चबुतरा) मोकळ्या जागेसाठी भाडे पट्ट्याने खुला लिलाव मागविण्याबाबत भाडे पट्टा व ना परतावा अनामत रक्कम निश्चित करण्यासाठी ठराव करण्यात आला आहे. सध्या मारुती मंदिर येथील नियोजित पार्किंगची जागा अन्य प्रयोजनासाठी दिल्याने वाहन पार्किंगची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मारुती मंदिर समोरील आंब्याच्या झाडाखाली चार चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी व अन्य वाहनांची व्यवस्था मोकळी जागा नसल्याने वाहतूक व्यवस्थेला अडथळा होत असून वाहन धारकांना अन्यत्र व आत पार्किंग केल्यास दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय छत्रपती शिवाजी स्टेडियम च्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोर मोकळी जागा असल्याने स्टेडियम व कार्यक्रमांच्या वेळी वाहनधारकांना सदर जागेत पार्किंग करणे सोयीचे होणार आहे. तरी सदर जागा भुई भाड्याने व्यवसायासाठी न देता दुचाकी व अन्य वाहनांसाठी पार्किंग आरक्षित करण्यात यावे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होऊन व वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. तरी र. न.प. सभा ठराव क्र.३० दि.१६/०७/२०२० चा कायदेशीर चौकशी होऊन महाराष्ट्र अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार रद्द करण्यात यावे अशी विनंती. रमाकांतर आगरे यांनी केली आहे.

*दखल न्यूज भारत*