आर्यन विलास पाटील याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार

0
118

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

खेड : बेटिया इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पटना बिहार आवॉर्ड कार्यक्रम गुरूवार दिनांक २४ डिसेंबर रोजी नुकताच पार पडला. यात भारताबरोबर २९ देशासह जगभरातून ११५० हुन अधिक फिल्मने सहभाग नोंदविला होतो. या सर्व लघुपटामधून निर्माता दिग्दर्शक शिवाजी मालवणकर निर्मित व श्री नंदा आचरेकर लिखित ‘चित्रकार’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट व बालकलाकार आर्यन विलास पाटील यांस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला. प्रमुख ऍक्टर 30 फेम तसेच बिहार राज्यातील नामांकित कलाकार दिग्दर्शक व निर्माते हजर होते. तसेच बेटिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजक राहुल वर्मा सर, यांनी लघुपटाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी आयोजक कलाकार राहुल वर्मा सर यांनी बालकलाकार आर्यन पाटील याच्याशी संवाद साधून त्याच्या अभिनयाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.त्याला पुढील आगामी चित्रपट मध्ये संधी देण्याचे आवाहन केले आहे.
आर्यन पाटील एस पी एम इंग्लिश मेडीएम स्कुल परशुराम येथे आर्यन इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. आतापर्यंत बालकलाकार आर्यन पाटील व चित्रकार लघुपटाला गेल्या आठ महिन्यात ३३ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तेलंगाणा राज्यतर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवात देखील आर्यन ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला.व केरळ,आंध्रप्रदेश कोलकत्ता ,बिहार, पटना मध्ये पण पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नुकताच आर्यन पाटीलला राज्यस्तरीय आदर्श बालगौरव कलारत्न विशेष गुणरत्न किड्स आचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड 2020 जाहीर झाला आहे.त्याच्या यशामध्ये त्याचे आईवडील, निर्माता शिवाजी मालवणकर, लेखक नंदा आचरेकर,व संपूर्ण चित्रकार टीम, हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.अनेक मान्यवरांनी कौतुक करून चित्रकार टीम आणि आर्यन पाटीलला खूप शुभेच्छा दिल्या.आर्यन पाटील आणि चित्रकार टीम चे जगभरातुन कौतुक होत आहे.

*दखल न्यूज भारत*