मूत्रपिंड (किडनी) आजाराने ग्रासले पुसुकपली हे गाव…. प्रशासनाने दखल घेण्याचे मागणी -सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोयर

142

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुडडीगुडम : अहेरी तालुक्यातील नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पुसुकपली हे गाव मूत्रपिंड आजाराने ग्रासले आहे.
सदर गावात अनेक नागरिक मूत्रपिंड आजाराने त्रस्त आहेत.या गावातील आजपर्यंत या आजाराने सात रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.व चार रुग्ण याच आजाराने उपचार घेत आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मूत्रपिंडाचे आजाराचे उपचारासाठी चंद्रपूर, नागपुर, गडचिरोली सारख्या मोठया नगरामध्ये जावे लागते नागरिकांना हे उपचार परवडण्यासारखे नसल्याने ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याची आर्त हाक पुसुकपली वासी देत आहेत.
“गावातील अनेक आजारी नागरिकांचे लक्षणे सारखी आढडल्याने गावकरी चिंतीत आहेत.मूत्रपिंडाचे महागडा उपचार करण्याची परिस्थिती नागरिकांची नसल्याने उपचाराअभावी मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.याबाबत प्रशासनाला कळवूनही या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याची गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोयर यांनी म्हटले आहे.”