सावली तालुक्यात आढळला पहिला कोरोना पॉसिटीव्ह

सावली ..सुधाकर दुधे
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका आजपर्यंत कोरोना मुक्त तालुका म्हणून गणल्या गेला होता. परंतु तालुक्यात कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती आढळल्याने एकाच खडबड उडाली आहे. सदर व्यक्ती तालुक्यातील लोंढोली येथील रहिवाशी असून तो वाशीम येथील कारंजा येथून आठ दिवसापूर्वी आलेला आहे. त्याला संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
गेल्या साडे तीन महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉक डाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे. एवढे असताना चंद्रपूर जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी पहिला पॉसिटीव्ह रुग्ण आढळला. त्यात आजपर्यत सावली तालुका अपवाद होता. परंतु तालुक्यात पहिला रुग्ण आढळून कोरोना विषाणू चा तालुक्यात शिरकाव झाला आहे. सादर व्यक्ती वाशीम जिल्यातील कारंजा लाड येथील तेल कंपणी मध्ये कामावर असल्याचे समजते. मागील आठ दिवसापूर्वी तो आपल्या स्वगावी लोंढोली येथे आला होता. त्याला संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेण्यात आले होते.. त्याचा नुकताच अहवाल पॉसिटीव्ह आल्याने तालुक्यात खडबड उडाली आहे