अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा युवक कांग्रेस ची मांगनी :-चेतन गेडाम युवक काँग्रेस तर्फे राष्ट्रपति ला निवेदन पाठविले

0
62

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरीही विद्यापीठ अनुदान आयोगाने या परीक्षा सप्टेंबर पर्यंत घ्यावा यासाठी दबाव आणत आहे. या प्रकारच्या विरोधात युवक काँग्रेस तर्फे चेतन गेडाम अध्यक्ष यु.काँ. बल्लारपुर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बल्लारपुर यांना निवेदन देण्यात आले व हे निवेदन मा. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली. सध्या भारतात 12 लाख व महाराष्ट्रात 3 लाख कोरोना रुग्णाची नोंद आहे, अश्या परिस्थितीत अंतिम वर्षाची परीक्षा घेणे ही विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या आरोग्याशी खेळ करणे होय असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अंतिम सेमिस्टर चे परीक्षा फी माफ करण्यात यावी व अंतिम वर्षाचा निकाल हे त्यांचं मागील सेमिस्टरच्या गुणवत्ता नुसार देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे शंकर महाकाली महासचिव बल्लारपुर,गोपाल कलवला,अजहर शेख,मगेश बावणे,राजकरण केशकर,मलेश दरपेली,सोहेल शेख,रोशन ढेगड़े,संदीप चंडाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.