लोहारी व चिंचखेड येथे सुरक्षित फवारणीचे प्रात्यक्षिक सादर

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला संलग्नित स्वा.वि. गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गौरव प्रदीप ठाकरे यांनी चिंचखेड(लोहारी) येथे कृषि ग्रामीण कार्यानुभव योजनेअंतर्गत शेतकरी बांधवानी रासायनिक कीटकनाशके व तणनाशके यांची सुरक्षित फवारणी कशी करावी या विषयावर प्रात्यक्षिक सादर केले. शेतकऱ्यांनी फवारणी करताना कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे. यावर कृषिदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शेतकरी नंदकुमार ठाकरे,रमेश ठाकरे,बाबूलाल लापूरकर,सुयश ठाकरे, आदी उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदूतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे,समुपदेशक प्राध्यापिका व्ही.टी. कपले, प्राध्यापिका प्रगती तांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.