Home नांदेड नांदेडचा लॉकडाऊन कधी होणार अनलॉक चला जाणुन घेऊया त्यावर काय निर्देश दिले...

नांदेडचा लॉकडाऊन कधी होणार अनलॉक चला जाणुन घेऊया त्यावर काय निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी

572

 

राजेश बालाजीराव नाईक,,
जिल्हा प्रतिनिधी, नांदेड,,
दखल न्यूज / दखल न्यूज भारत,,

नांदेड:- दि २३
-सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश
– शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक
– जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही।।

– सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस *सकाळी १० ते ४ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा.

संचारबंदी :-
– दररोज सायंकाळी ५ ते सकाळी ७

– व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी

– शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरवा कंदील

– कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्यास मनाई (वारंवार सनेटायझरचा वापर बंधनकारक)

– लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेत सकाळी ७ ते सायंकाळी ५ ची वेळ,
– दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई

केश कर्तनालय/ सलूनसाठी अटी व शर्ती :
१. प्रत्येक ग्राहकाने फोनवर पूर्वकल्पना देऊन वेळ ठरविल्याशिवाय प्रवेश नको.
२. प्रत्येक ग्राहकाने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल/नॅपकिन सोबत आणणे अनिवार्य. नसेल तर प्रवेशास मनाई. एकाचा टॉवेल दुसऱ्यास वापरण्यास सक्त मनाई.
३. सलून साहित्य प्रत्येक ग्राहकास वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक.
४. सलूनमध्ये सेवा देणारा व घेणारा वगळून इतर प्रत्येक दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर असावे.
५.चार पेक्षा अधिक ग्राहकांना थांबण्यास परवानगी नाही.
६. दाढी, केशकर्तन व सलून झाल्यानंतर खुर्ची प्रत्येक वेळी निर्जंतुक करणे आवश्यक.

काय काय सुरू राहणार??

– दारुची दुकाने
– टॅक्सी, कॅब, रिक्शा चारचाकी वाहने (१+२ व्यक्ती)
– दुचाकी वाहने (१ व्यक्ती)
– शहरी एकल विक्रेता दुकाने
– अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने
– ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू
– ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तू
– खाजगी कार्यालये
– शासकीय कार्यालये (१०० टक्के उपस्थिती आवश्यक)
– कृषिविषयक कार्य
– बँक आणि वित्त
– कुरियर व पोस्टल सेवा –
– वैद्यकिय अतितात्काळ सेवांची हालचाल
– प्रेक्षकांना व्यतिरिक्त स्टेडियम
– घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट

ही सर्व दुकाने शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय काय बंद राहणार?
– हवाई, रेल्वे व मेट्रो प्रवास
– आंतरराज्य मार्ग वाहतूक
– शैक्षणिक संस्था
– आदरातिथ्य/ हॉटेल
– शॉपिंग मॉल्स
– प्रार्थना स्थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे
– ६५ वर्षे वयावरील व १० वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा
– आंतरजिल्हा बस सेवा
शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून)
– शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल
– सामाजिक/धार्मिक/शैक्षणिक/राजकीय कार्यक्रम/सभा/मेळावे
– व्यायामशाळा, जल तरणिका
– सर्व धार्मिक स्थळे
– हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे
– तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री

कँटेटमेंट झोनमध्ये फक्त मालाचा पुरवठा ही एकमेव सेवा सुरू राहील.

*असा लागेल दंड:*

+ शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड!

खालील कारणासाठी एक हजार रुपये दंड

१. शारीरिक अंतर ठेवले नाही
२. थुंकल्यास
३. मास्क न वापरल्यास

नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना ५ हजार दंड व दुकान बंद

+ लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर

+ ग्राहक जास्त वेळ थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही.
फक्त पार्सल सेवा देता येईल.
हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवत येईल.

Previous article“जय भवानी जय शिवाजी”लिहून एक हजार पोस्टकार्ड वणी येथील युवक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.
Next articleलोहारी व चिंचखेड येथे सुरक्षित फवारणीचे प्रात्यक्षिक सादर