“जय भवानी जय शिवाजी”लिहून एक हजार पोस्टकार्ड वणी येथील युवक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.

253

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी:
भारताचे संविधान लिहताना मला जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्या समोर छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचा आदर्श होता. असे गौरवाद्वारे संविधान समितीचे अध्यक्ष मा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले आहेत हे व्यंकय्या नायडुंना माहित आहे का?

या देशाच्या लोकशाहीचा पायाच शिवछत्रपतींच्या राज्यकारभारावर आधारीत असुन देशाचे पंतप्रधान सुद्धा शिवरायांच्या चरणी आपली निष्ठा दाखवतात हे व्यंकय्या नायडुंना माहित नाही का?

जिथं या देशाचे पंतप्रधान स्वतःला जनतेचे सेवक आणि देशाचे चौकीदार समजतात तिथं “It’s my chamber” म्हणणारे नायडु संसदेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात काय? असा सवाल वणी येथील युवकांनी पत्राच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे.

स्वतःच्या बापाचं नाव ऐकायची लाज वाटणारेच शिवरायांच्या नावाला आक्षेप घेऊ शकतात एवढी साधी समज व्यंकय्या नायडुंना नाही का ? देशाच्या उच्च पदावर असलेल्या नायडुंच्या शिवरायांचा जयघोषाला आक्षेप घेण्याच्या मुर्खपणाचा समस्त शिवराय प्रेमी तीव्र निषेध करत असुन नायडुंनी स्वतः मर्यादा पाळायला हव्यात. छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयघोषाला विरोध करणाऱ्यांची अपवित्र पाऊले किमान महाराष्ट्राच्या पवित्र मातीला न लागलेलीच बरी.

तुम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य असा, कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनेचे सदस्य असा नायडुंच्या वागण्याचा निषेध करायचा स्वाभिमान आपण सर्वांनी दाखवायलाच हवा असे आवाहन वणी येथील तरुणांनी केले. यावेळी शुभम इंगळे, निखील झट्टे,प्रणव पिंपळे,रोहन शिरभाते,गौरव देशमुख,सौरभ कोल्हे,वैभव राजूरकर,आशिष निखडे,सुरज नरडेवर,प्रणव हांडे,प्रतीक बोधे,शुभम चवणे,विनीत आस्कर,निखिल एकरे आदी युवक उपास्थित होते.