Home राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले गरजू लोकांना...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले गरजू लोकांना किराणा वाटप

158

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

शहरात कोरोना महामारी मुळे गेल्या सात दिवसांपासून संपूर्ण लॉक डाऊन पाळला जात आहे. दरम्यान कितीतरी गरजू लोकांचे हाताचे काम गेले आहे. अशात गरजूंना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आकोट शहरांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किराणा व खाद्य सामानाचे वाटप केले.
या उपक्रमांतर्गत शंभर लोकांना साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवा मोहोड , माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर, शहर अध्यक्ष नवनीत लखोटिया, सतीश हांडे, राहुल सोनार ,नितीन सगणे, सुमित ठाकूर, सागर ठाकुर,आकाश सुंडेवाले, लखन धुळधुळे व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.

Previous articleभाजप सरकारचा व व्यंकया नायडू यांचा शिवसेना चिमूर तर्फे जाहीर निषेध
Next article“जय भवानी जय शिवाजी”लिहून एक हजार पोस्टकार्ड वणी येथील युवक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.