नागपुर जिल्हाधिकारी व डीसीपी करताहेत शासकीय आदेशाची अवहेलना; कोरोना पार्श्वभूमीवर कामठीत बिना मास्क वापरता घेतली आढावा बैठक

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी /नागपुर :२३ जुलै २०२०
एकीकडे केंद्र व राज्य सरकारने कोरोना पार्श्वभूमीवर संबंधित नागपूर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती तसेच गंभीर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या नागपुर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व डीसीपी निलोत्पल झोन ५ हे स्वतःच उल्लंघन करतांना आढळून येत आहेत.
कोरोना पार्श्वभूमीवर कामठी तहसील कार्यालयात ३-४ दिवसांपुर्वी कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित सभेत जिल्हाधिकारी नागपुर व डीसीपी निलोत्पल यांचे सोबत कामठी नगरपरिषद चे अध्यक्ष शाहजहां शफाअत अंसारी हे सुद्धा उपस्थित होते. भलेही शाहजहां अंसारी हे या सभेत मास्क घालुन बसलेले आहेत. परंतु त्यांच्या बाजुला बसलेले डीसीपी निलोत्पल तसेच जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मास्क वापरलेच नव्हते. त्यांचे मास्क गळ्यात लटकलेले होते.
मग आता नागपुरकरांना प्रश्न पडले आहे की कोरोना पार्श्वभूमीवर लाँक डाऊन, फिजिकल डिस्टेंसिंग, मास्क, सेनिटायजर हे सर्व केवळ जनतेलाच आवश्यक व अनिवार्य आहे काय? नागपुरकरांना शिस्त सांगणाऱ्या जिल्हाधिकारी नागपुर तसेच डीसीपी निलोत्पल हे त्याची अंमलबजावणी स्वतःपासून का नाही करीत? सर्वसामान्य लोकांनी मास्क वापरले नाही म्हणून एकीकडे कायदेशीर व दंडात्मक कारवाई नागपुरकरांवर केली जाते. मग या अधिकाऱ्यांना खुली सुट का? काल जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे तसेच डीसीपी निलोत्पल यांच्या शेजारी बसलेले कामठी नगरपरिषद अध्यक्ष शाहजहां शफाअत अंसारी हे कोरोना पाँजिटीव आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व डीसीपी निलोत्पल यांनी स्वतःची कोव्हीड १९ ची रैपिड टेस्ट करुन स्वतःला कोरोंटाईन करुन घेतात का? असा प्रश्न आता नागपुर कर विचारत आहेत.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच ग्रृहमंत्री अनिलबाबु देशमुख यां अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दल काही कारवाई करतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.