Home शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम आलेल्या गायत्री चा सत्कार

जिल्ह्यात प्रथम आलेल्या गायत्री चा सत्कार

296

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

देसाईगंज दि 22 जुलै
येथील साईबाबा मंदिर चे संचालक मिलिंद सपाटे च्या वतीने एच. एस. सी. 12वि. च्या परीक्षेत 97% गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आलेली गायत्री सुधीर सोनटक्के हिचा व तिचे पालक यांचा रोख रक्कम व शाल देऊन सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्याने हा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी सी. आर. पी. एफ. 191 बटालियन चे चीफ प्रभाकर त्रिपाठी यांनी गायत्री ला ट्रॅक शूट सप्रेम भेट म्हणून देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर त्रिपाठी 191बटालियन चीफ होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, जिल्हा सरचिटणीस श्याम धाइत, तालुका अध्यक्ष क्षितिज उके, शहर अध्यक्ष लतीफ शेख. कार्यक्रम आयोजक मिलिंद सपाटे, कला व शंशकृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष भुवन लीलहारे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कपिलदेव कुमार, नगरसेवक हेमा कावळे, शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू चावला, काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष पिंकू बावणे, रवी रणदिवे, मनोज ढोरे, भास्कर वाटकर, शैलेश सोनटक्के, बाळू कुलमेठे, लांडगे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे संचालन व आभार प्रदर्शन रोशन शेंडे यांनी केले

Previous articleपारशिवनी येथे दुसरा रूग्ण महिला पॉझिटिव्ह
Next articleमंगरुळपीर तहसिल आवारात पाणीच पाणी