ऋषी सहारे
संपादक
गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंपा समोर बस आणि दुचाकी चा आपसात जबर धडक झाली असून या धडकेत कूरखेडा तालूक्यातील वासी येथील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.ते लग्न कार्या करीता सकाळीच दूचाकीने निघाले होते दुचाकीस्वार हे सडक अर्जुनी येथील पेट्रोल पंप वरून पेट्रोल भरून निघाले असताना गोंदिया कडून येत असलेल्या गोंदिया वडसा चंद्रपूर बस क्रमांक एम एच ४० वाय ५२०८ या बसला समोरून या दुचाकी क्रमांक एम एच ३३ आर ८६४० चा बस ला जबर धडक दिली असताना धडक इतकी जोरदार होती की दुचाकी वरील तीन तरुणा पैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जख्मी आहे, त्याला गोंदिया येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे, मृतक मध्ये रुपचंद गणिराम प्रधान २६ वर्ष व प्रदीप विजय औरासे २४ वर्ष रा.वासी ता कुरखेडा, गडचिरोली यांचा समावेश आहे तर जखमी मध्ये विनोद प्रधान २६ वर्ष रा वासी कुरखेडा, गडचिरोली असे आहे. हि धडक इतकी जोरदार होती कि या धडकेने बस ला पेट घेतली, मात्र परिसरातील लोकांनी व पेट्रोल पंपावरील युवकांनी या बसची आग विझविण्यात आली असुन बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. डुगीपार पोलिसांनी घटना स्थळी येत पंचनामा करत दोन्ही मृत देह ग्रामीण रुग्णालयात साविच्छेदना करिता पाठविले व गुन्हा नोंद करीत पुढील तपास करीत आहे.