पारशिवनी येथे दुसरा रूग्ण महिला पॉझिटिव्ह

192

पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले गाव पालोरा येथे कोरोना तपासणीमध्ये ४५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खडबळ उडाली आहे.
सदर महिला ही ग्राम पालोरा येथील रहिवासी असून, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय कामठी येथे करीत असते. त्यामुळे हीची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पारशिवनीचे तहसीलदार वरूणकुमार सहारे, गटविकास अधिकारी प्रदीप ब्रमनोटे, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, ग्रामविकास अधिकारी विनायक गहाणे, सरपंच प्रकाश कामळे स्थळी पोहोचले आणि परिसर सँनिटायझरींग करून एक मोहल्ला शील करण्यात आला. पारशिवनी शहरात एक पुलिस कर्मचारी व तेथून दोन किमी लांबवर असलेल्या पालोरा ग्राम पंचायात गावात कोरोना रुग्ण आढळून आल्याने पारशिवनीत आत दोन २ कोरोणा रूग्ण आढल्याने परिसरात खळबड उडून दहशतीचे वातावरण निर्माण झाले.