एका मृत्यूसह 19 नवीन कोरोना बाधित 35 कोरोनामुक्त

जिल्हयात नव्याने 19 नवीन बाधित आढळून आले. तसेच 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज नवीन एका मृत्यूमध्ये कुरखेडा तालुका रा.गुरनोली येथील 80 वर्षीय महिला एचटीएन आणि मधुमेहाने पीडित होती.
नवीन 19 बाधितांमध्ये गडचिरोली 8, अहेरी 4, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोलिस स्टेशन पोटेगाव 1, भगवती राईस मिल 2, कोटगल 1, वनश्री कॉलनी 1, आशिर्वादनगर 1, आरमोरी रोड 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीआरपीएफ 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये लखमापुर बोरी 1, ईल्लुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकानंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एकरपूर 1, शिवाजी वार्ड 1, राजेंद्र वार्ड 2, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.