२०% टक्के वेतन अनुदानाचे आदेश निर्गमित करण्याबाबद शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आ.कृष्णा गजबे आरमोरी वि. क्षेत्र यांना निवेदन

0
293

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

देसाईगंज- मार्च 2020 च्या अधिवेशनात 146+1638 विना अनुदानित ज्यू. कॉलेज ची 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत 146+1638 कॉलेज मधील प्रत्येक कॉलेजची तपासणी अर्थखाकडून झाली आहे त्यानंतर ही सर्व कॉलेज पात्र ठरवून त्यांची लेखाशीर्ष इ 2-22020511 नुसतं 107 कोटीची पुरवणी मागणी मंजूर केली आहे. सर्व अर्थखात्याचे निकष ज्यू कॉलेज/ उच्च माध्यमिक शाळांनी आधीच पूर्ण केलेले आहेत तरीही अजून पर्यंत शासनाकडून अनुदान मंजूर असूनही 1 रु. ही वेतन मिळालेले नाही व आज पासून 20% निधी देतो म्हटल्यास 1 कोटी फक्त दर महिन्याला लागणार तरी नस्ती क्रमांक उमाशा 2019 प्र.क्र. 121/एस एम 4 संगणक क्रमांक 478986 कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याने ती फाईल काढण्यात यावी. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृहावर विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक पार पडली. पुरवणी मंजूर झाल्यानुसार उच्च माध्यमिक प्राथमिक माध्यमिक शाळांना त्वरित हा विषय कॅबिनेट समोर ठेऊन 20% वेतन सुरू केले जाईल यावर एकमत झाले तशी माहिती खुद्द अजितदादा पवार यांनी दिली होती. त्यानुसार फाईल शिक्षणखात्याकडून वित्तविभागाकडे पाठवली गेली परंतु वित्तसचिवांनी फाईल मंजूर करून कॅबिनेट समोर ठेवली नाही? याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आ. कृष्णाजी गजबे आरमोरी वि. क्षेत्र यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना धनपालजी भैसारे शिक्षक विवेकानंद ज्युनियर कॉलेज आरमोरी, पी एस वालदे शिक्षक आकाश माध्यमिक विद्यालय मोहझरी इ. उपस्थित होते.