चिमूर येथे लागोपाठ होणाऱ्या दारूबंदी कारवाही मुळे चिमूर शांत

135

तालुका प्रतिनिधी- दिपक पाटील

चिमूर-
अनेक दिवसांपासून चिमूर पोलीस चालवत असलेल्या दारूबंदी करवाहिमुळे चिमुरात शांतता असताना काही दारूविक्रेते हे चिमुराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे . हीच शांतता कायम राहण्यासाठी चिमूर पोलिस दिवस रात्र करून दारूबंदीची कारवाही करीत आहे यातच चिमूर येथील आरोपी महिला नासीमा फिरोज शेख ही आपल्या मोटार सायकल वर देशी व मोहदारू आणत असल्याची माहिती प्राप्त होताच रेड केली असता सदर महिला आरोपी ही पोलिसांच्या धास्तीने पळून गेली असता तिने आणलेला देशी दारू , मोहदारू , मोटारसायकल असा एकूण 1,23,400 रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला तसेच ग्राम मालेवाडा येथे श्रीकृष्ण शंकर श्रीराम हा देशी दारू विक्री करीत असल्याचे माहिती वरून रेड केली असता त्याचे ताब्यातून 5200 रु ची देशी दारू मिळून आली. असा एकूण 128600 रु. चा देशी , मोहदारू,मोटार सायकल चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपितांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपितांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाही मा.श्री अनुज तारे उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर , मा स्वप्नील धुळे पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्यात पोहवा विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, सतीश झिलपे, महिला पोशी महानंदा आंधडे यांनी पार पाडली.