अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा. आकाश परसा अध्यक्ष, यु.काँ. अहेरी विधानसभा क्षेत्र. मा. जसवंत, तहसीलदार सिरोंचा यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन सादर.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरीही विद्यापीठ अनुदान आयोगाने या परीक्षा सप्टेंबर पर्यंत घ्यावा यासाठी दबाव आणत आहे. या प्रकारच्या विरोधात युवक काँग्रेस तर्फे आकाश परसा अध्यक्ष, यु.काँ. अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वाखाली मा. जसवंत, तहसीलदार सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले व हे निवेदन मा. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली. सध्या भारतात 12 लाख व महाराष्ट्रात 3 लाख कोरोना रुग्णाची नोंद आहे, अश्या परिस्थितीत अंतिम वर्षाची परीक्षा घेणे ही विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या आरोग्याशी खेळ करणे होय असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अंतिम सेमिस्टर चे परीक्षा फी माफ करण्यात यावी व अंतिम वर्षाचा निकाल हे त्यांचं मागील सेमिस्टरच्या गुणवत्ता नुसार देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष नवाज सयद, युवक काँग्रेसचे कार्यकर्ता हरीश बट्टी, पत्रकार मंगेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.