“रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा”.. आमदार मा. अनिकेतभाई तटकरे यांच्यावतीने खेड नगरपरिषदेला सुसज्ज रुग्णवाहिका मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. वैभवजी खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश

142

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

खेड :- खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष खेड शहरवासीयांसाठी कोरोना काळात खरे देवदूत ठरलेले खेडच्या नागरिकांच्या मनातील खरे कोरोना योध्दा मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभवज खेडेकर यांच्या अथक प्रयत्नातून विधानपरिषद आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वतीने खासदार मा. सुनीलजी तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा च्या वतीने खेड नगरपरिषदेला क्षेत्राकरीता सुसज्ज अशी रुग्णवाहिका मिळाली आहे ..

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दि. २२ जुलै रोजी सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या मागणीवरून आमदार मा. अनिकेत भाई तटकरे यांच्या वतीने खेड ला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा पार पडला..
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खेड शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकेची नितांत आवशकता होती ,या बाबत खेडेकर यांनी पत्रव्यवहार आणि स्वतः भेट घेऊन आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे रुगवाहिकेची मागणी केली होती, नागरिकांची होणारी गैरसोय आणि अपघात काळात रुग्णवाहिका अत्यंत गरजेचे आहे, याचा विचार करून आमदार अनिकेत तटकरे यांनी तात्काळ रुग्णवाहिका देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी खेड दौऱ्यात नगराध्यक्ष मा.वैभवजी खेडेकर यांना सांगितले होते, या रुग्णवाहिकाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी आमदार अनिकेतभाई तटकरे, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. शेखरजी निकम, दापोली-मंडणगड- खेड विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री. संजयराव कदम,मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा परिषद मा. विरोधी पक्षनेते श्री. अजयजी बिरवटकर, मनसे तालुकाध्यक्ष मा.नगरसेवक श्री.शरद शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री.स.तु.कदम, शहराध्यक्ष तथा गटनेते श्री. भूषण चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा मा.नगरसेवक श्री. सतिश चिकणे, महिला व बाल कल्याण समिती सभापती नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, नगरसेवक श्री. अजय माने, नगरसेवक श्री. तौसिफ खोत, नगरसेवक श्री. ईलियास खतिब, नगरसेविका सौ. जयमाला पाटणे, जयेश गुहागरक,प्रदिप भोसले, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते ..
*दखल न्यूज भारत*