गडचिरोली जिल्ह्यातील निवड झालेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना हंगामी कामे देण्यात यावे. श्री. गीतेश खेवले अध्यक्ष (हं.क्षे. कर्मचारी) यांच्या नेतृत्वात जि. प. अध्यक्ष मा. अजय कंकडालवार यांना निवेदन सादर.

142

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

जिल्ह्यामध्ये सन 2016 मध्ये काही हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती त्याना हंगामी कामे मिळावेत करिता निवड झालेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना हंगामी कामे मिळवून देण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या मागणीसंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. जून २०२० मध्ये हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना २९ दिवस कामांचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे २९ दिवस हिवताप नियंत्रणाचे काम करण्यात आले. या आदेशाप्रमाणे ठरवून दिलेले मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या दुर्गम ठिकाणी आदेश मिळाल्याप्रमाणे हंगामी क्षेत्र कर्मचारी यांनी स्वतः राहण्याची, जेवणाची सुविधा केली. यामध्ये प्रत्येक हंगामी क्षेत्र कर्मचारी यांनी खोली भाड्याने घेऊन घरमालकास तीन महिन्याच्या भाड्याची अनामत रक्कम देण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून आमच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले. यामुळे आमच्यावर उपासमारीची व बेरोजगारीची पाळी आलेली आहे. कोरोना महामारीच्या काळात देखील आपल्या जीवनाची पर्वा न करता कामे केली. परंतु जिल्हा हिवताप अधिकारी यांनी आम्हाला कामावरून काढून टाकले व आमच्यावर अन्याय केला आहे. याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देवून जुलै महिन्यापासून आदेश देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अध्यक्ष हंगामी क्षेत्र कर्मचारी गीतेश खेवले यांच्या नेतृत्वाखाली हंगामी क्षेत्र कर्मचारी श्री. देवानंद किसन नंदेश्वर, श्री. अविनाश बिराजी कंकलवार तथा उपस्थित सर्व हंगामी क्षेत्र कर्मचारी आदींनी निवेदनातून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे केली आहे.