साईबाबा मंदिर गांधी वार्ड च्या वतीने गायत्री सोनटक्के चा सत्कार

201

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा

देसाईगंज– देसाईगंज येथील साईबाबा मंदिर चे संचालक मिलिंद सपाटे च्या वतीने एच. एस. सी. 12 वीच्या परीक्षेत 97% गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आलेली गायत्री सुधीर सोनटक्के हिचा व तिचे पालक यांचा रोख रक्कम व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सी. आर. पी. एफ. 191 बटालियन चे चीफ प्रभाकर त्रिपाठी यांनी गायत्री ला ट्रॅक शूट सप्रेम भेट म्हणून देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर त्रिपाठी 191बटालियन चीफ होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव युनूसभाई शेख, जिल्हा सरचिटणीस श्याम धाइत, तालुका अध्यक्ष क्षितिज उके, शहर अध्यक्ष लतीफ शेख. कार्यक्रम आयोजक मिलिंद भाऊ सपाटे, कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष भुवन भाऊ लील्हारे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कपिलदेव कुमार, नगरसेवक हेमा कावळे, शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदूभाऊ चावला, काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष पिंकूभाऊ बावणे, रवी भाऊ रणदिवे, मनोज ढोरे, भास्कर वाटकर, शैलेश सोनटक्के, बाळू कुलमेठे, लांडगे सर इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे संचालन व आभार प्रदर्शन रोशन शेंडे यांनी केले