घोगरा-पाटीलटोला गावातील शंकरचा विजेने घेतला अखेरचा घास तर बहीण मीना उर्फ मीनाक्षी गंभीर

170

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा : सुशीला यादोराव उईके यांचे दत्तक मुले शंकर हेमराज उईके, मुलगी मीना यादोराव उईके ही दोन्ही मावसबहीण भाऊ यादोराव गणू उईके पाटीलटोला यांचेकडे राहत होते. शंकर यास वडील नाहीत.

दोघे बहीण भाऊ शेतावर जनावरांसाठी गवत आणण्यासाठी आज दिनांक दुपारी १.०० वाजताच्या सुमारास गेले होते. याच दरम्यान पावसाचे वातावरण तयार होऊन मेघ गर्जनेसह पावसास सुरुवात झाली. आसरा म्हणून ती बहीण भाऊ आंब्याच्या झाडाच्या बुंध्याशी गेले. दरम्यान दमदार वीज कडाडली व शेजारी पडली. त्याच्या धक्याने शंकर यांचा घास जागीच घेतला. त्याचे अंदाजे वय २४ वर्ष आहे. तर मुलगी नामे मीना ही वीजेच्या धोक्याने गंभीर जळून जखमी झाली. तिचे अंदाजे वय २० वर्ष असे आहे.

बांधावरच शेतकरी असल्याने मुलीला लगेच उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले.

घटनेची दखल पोलीस स्टेशन तिरोडा यांनी तातडीने घेतली आहे. ठाणेदार उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास मुंडीकोटा पोलीस दुरक्षेत्र इंचार्ज पीएसआय लाला लोंनकारसह हवालदार रोशन गोंडाने करीत आहेत.

घोगरा येथील तलाठी भुते यांनी सदर घटनेची माहिती तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना अवगत केली असून प्रशासनाकडून मदतीचे कार्यवाही तजवीज ठेवलेली आहे.

दत्तक मुलाचे आकस्मिक मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी झाल्याने पाटिलटोला,घोगरा गावासह मुंडीकोटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.