पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याच्या आदेशाने लिलाव अखेर थांबला भंगार लिलावाला नाटकीय वळण

142

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान :(ता प्र) – कन्हान ठाण्या आवारातील जप्ती असलेले भंगार २९ जुन ला ठाणेदार त्रिपाठी यांनी कोणतीही पोलीस अधीक्ष क व दिवाणी न्यायालयाची परवानगी न घेता कोविड-१९ लढयात संपूर्ण देश झुंज देत असताना निव्वळ लाभा पोटी चार चाकी वाहनात भंगार भरून नेण्यात आले. मात्र कन्हान च्या पत्रकारांनी याला व्याच्याता फोडल्याने ठाण्यातुन निघाले ला भंगार अवघ्या काहीच तासात परत पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आले. याची तक्रार संबंधित अधिकाऱ्या कडे राष्ट्रवादी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी केल्याने अखेर कामठी उपविभागाचे पोलीस उपविभा गीय अधिकारी यांच्या २२ जुले च्या काढलेल्या आदेशाने लिलाव थांबविण्यात आला.
सविस्तर असे की २९ जून पासुन सुरू झालेला प्रकार स्थानीय पत्रकारांनी उचलुन धरला व ठाणेदार त्रिपाठी च्या विरोधात कन्हान शहरात चर्चेला उधाण आले होते. यातील उणीवा पूर्ण करण्या करिता तसेच सारवासारव करण्याच्या उद्देशाने महसुल खात्याचे रामटेक उपवि भागीय अधिकारी जोगेन्द कटियारे यांना १३ जुले ला संबं धित भंगाराच्या लिलावा बाबत परवानगी करीता मागणी केली. या मागणीची शहानिशा न करता लगबगीत परवानगी देऊन २२ जुले ला लिलाव होणार होता त्याकरिता २१तारखेपर्यंत सबंधीत लिलावात सहभागी होण्याकरिता नाव नोंदविणे गरजेचे होते. याकरिता काही कबाड व्यवसाय करणाऱ्यांनी नाव नोंदविले. मात्र याची तक्रार २० तारखेला जिल्हाधि कारी यांना या लिलाव प्रक्रियेमुळे कन्हा न शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याची तक्रार करण्यात आल्याने निवासी उपजिल्हाधि काऱ्यांनी २१जुले ला उपविभागीय अधिकारी रामटेक यांना पत्र देऊन लिलाव थांबविण्याची सुचना देण्यात आली. मात्र ते पत्र वेळे अभावी रामटेक कार्यालयात किंवा उपविभागीय अधिकारी यांना मि ळु शकले नसल्याने लिलाव प्रक्रियेच्या दिवशी चंद्रशेखर भिमटे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी वकीला सह आपले म्हणणे सादर करत आक्षेप नोंदविला व शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्या स स्थानीय प्रशासन जवाबदार असल्या चे सांगताच रामटेकच्या अधिकाऱ्यांनी कामठी पोलीस उपविभागीय अधिकारी यांना आदेश देऊन चौकशी करून लिला व प्रक्रिया पुर्ण करण्याचे तात्काळ आदेश दिले. मात्र याचा फायदा घेत कन्हान च्या ठाणेदारांनी लगबगीत प्रक्रिया पुर्ण करून घेतली मात्र लिलाव झालेल्या कामठीतील भंगार व्यापाराला तो भंगार देण्या पुर्वीच पोलिस उपविभागीय अधि काऱ्यांनी आदेश देत प्रक्रिया थांबविण्या चे आदेश दिले व प्रक्रिया झाली असल्या स चन्द्रशेखर भिमटे यांनी तक्रारीत केले ल्या आक्षेपाची पुर्ण मौका चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करावया स सांगितले. चौकशी अखेर पालन केलेली प्रक्रिया योग्य असल्यास लिलाव प्रक्रिया घेण्यात यावी अन्यथा त्याशिवाय लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊ नये असे आदेश कन्हान पोलिसांना मिळताच खळबळ माजली व तो लिलावाचा भंगार पोलीस स्टेशन च्या आवारातच ठेवावा लागला. यावर तक्रारदार चंद्रशेखर भिम टे न्यायालयात ठाणेदार च्या विरोधात खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.