राजाराम (खां) ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ अभियंता यांचे पदभार काढून दुसऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी..

121

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम खां ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ अभियंता यांचा पदभार कडून दुसऱ्याची नियुक्ती कऱण्यात यावी . अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.अभियंता श्री रामटेके यांची कार्यप्रणाली योग्य नसल्यामुळे जनतेला त्रास सोसावा लागत आहे.कोणत्याही योजनेचा काम पूर्ण झाल्यानंतरही एम.बी.रेकॉर्ड करण्यास टाळाटाळ करणे,त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतरही त्या कामाची योग्यता नाकारणे,व्हॅल्यूएशन कमी करणे,परत काम वाढविण्यास सांगणे,आर.ए.बिल काढण्यास नाकारणे या कारणास्तव काम करणाऱ्या ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. करिता अश्या मनमानी वागणाऱ्या अभियंत्यांची तात्काळ भारमुक्त करून दुसऱ्या अभियंत्याची नियुक्ती करावी अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवर यांच्याकडे निवेदनातून केली आहे या संदर्भात अहेरीचे पंचायत समिती सभापती व संवर्ग विकास अधिकारी यांना प्रतिलिपी देण्यात आले याप्रसंगी राजाराम येथील नागरिक उपस्थित होते.