मुसळधार पावसाच्या पुरात ईसम वाहुन गेला, बोरगाव(मेंढोली) येथिल घटना

131

 

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील बोरगाव(मेंढोली) येथे मुसळधार पावसाच्या पुरामध्ये एक ईसम वाहुन गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नारायन सिताराम काळे(७२) रा.बोरगाव(मेंढोली) असे पुरात वाहुन गेलेल्या व्रुद्ध ईसमाचे नाव आहे. आज दि.२२ जुलैला दररोज प्रमाणे आजही नारायन हे जनावरे चराईसाठी घेवुन गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजताचे सुमारास या परिसरात अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला त्यामुळे नारायनराव हे जनावरे घेऊन घराकडे निघाले. यादरम्यान
गावाजवळील नाल्यात पुर आला होता. त्या पुराचा अंदाज न आल्याने नारायन काळे हे व्रुद्ध ईसम पुरात वाहुन गेले. या घटनेची माहिती गावकर्यांना मिळताच नारायन चा शोधाशोध केली असता काही अंतरावर त्यांचा म्रुत्युदेहच आढळुन आला.या घटनेची माहिती शिरपुर पोलीसांना दिली असता शिरपुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. म्रुत्युदेहाचा पंचनामा करुन म्रुत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे.