हुमनेविस्तार अधिकाऱ्यासह भिसीच्या सरपंचबाई व उपसरपंच एलसिबीच्या अडकले जाळ्यात.. — ३० हजार लाचेचा प्रकार,ई-टेंडरिंग प्रकरणाला अनुसरून लाच घेणे आले अंगलट…

666

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
दामोधर रामटेके
कार्यकारी संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुका आहे व चिमूर तालुका अंतर्गत मौजा भिसी हे अप्पर तहसीलदार कार्यालयाचे ठिकाण आहे.राजकीय घडामोडी अंतर्गत मौजा भिसी हे खुप संवेदनशील गाव आहे.राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या भिसी गावच्या सरपंच योगीताताई अरुण गोहणे,उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड व विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने,हे आज ३० हजार रुपयांची लाच घेताना ए.सी.बी.च्या जाळ्यात अलगद अडकले.या घटनाक्रमामुळे चिमूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांत आणि कर्मचाऱ्यांत खडवळ माजली असून,ए.सी.बी.जाळ्यात सरपंच-उपसरपंच अडकल्याने,सदर प्रकरण मौजा भिसी येथे चांगलेच हवा निर्माण करीत असल्याचे चित्र आहे.
मागील एका ग्रामसेवकाने ई-टेंडरिंग न करता भिसी ग्रामपंचायत अंतर्गत कामे केली,या नियमबाह्य कामातंर्गत चौकशीचा ससेमीरा सुरू होता व चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने यांच्याकडे सदर चौकशीचे प्रकरण होते.
या चौकशी प्रकरणातून नाव वगळण्यासाठी,तात्कालिन ग्रामसेवक यांना,विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली.परंतू सदर ग्रामसेवकांची ३० हजार रुपये देण्याची अजिबात इच्छा नव्हती.
यामुळे त्या ग्रामसेवकांनी,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत,अतिशय सावधपणे प्रकरणाची चौकशी केली व सत्यता पडताळली.
सदर ई-टेंडरिंग प्रकरणातील चौकशी मधून नाव वगळण्यासाठी रुपयांची मागणी विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने करीत असल्याचे लक्षात आले.यानुसार आज विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला व अखेर विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमने,सरपंच योगीताताई गोहणे,उपसरपंच लिलाधर बन्सोड ए.सी.बी.च्या जाळ्यात लाच घेताना रंगेहाथ अडकले.
या प्रकरणामुळे प.स.चिमूर व मौजा भिसी येथे खडबळ माजली असून,चिमूर तालुकातंर्गत जनमानसात लाचलूचपत प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिस अधीक्षक रश्मि नांदेडकर,अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार,यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलिस उप अधीक्षक अविनाश भामरे,पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर,यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य कामगिरी बजावली.