सोनिया गांधीनगर आझादनगर विभागातील डेबरिज माती, सफाई मोहीम

0
50

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर विभागातील सोनिया गांधीनगर आझादनगर, हा बहुतांश भाग डोंगराळ असल्या कारणाने तसेच झोपडपट्टी युक्त परिसर असल्याने या विभागात दाटीवाटी युक्त घरे आहेत. त्यामुळे येथे जास्त कचरा झाल्यास या विभागात मच्छर व डास याचा प्रादुर्भाव होईल व रोगराई पसरेल, व सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई देखील खूप महत्वाची आहे. म्हणून विभागातील नागरिकांसाठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
सुहेल भाई सुबेदार यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागात
सोनिया गांधीनगर आझादनगर विभागातील डेबरिज माती, सफाई करून घेतली त्यावेळी
राष्ट्रीय सचिव अल्पसंख्याक सलिम पठाण ,तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक खलील अंसारी , वार्ड अध्यक्ष अल्पसंख्याक सोहेल ईनामदार , अलिम खान,रहीम शेख वार्ड क्र.१२९ ते वार्ड अध्यक्ष
आसीफ शेख उपस्थित होते