Home महाराष्ट्र ४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना भंडारा जिल्हा परिषदेचा प्रभारी शिक्षणाधिकारी अडकला एसीबीच्या...

४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना भंडारा जिल्हा परिषदेचा प्रभारी शिक्षणाधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

261

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे/ राहुल उके
दखल न्यूज भारत

भंडारा : सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत पत्र रद्द करण्याकरीता ४ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना भंडारा जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबड उडाली आहे.
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार हे समर्थनगर मुरमाडी ता. लाखनी जि. भंडारा येथील रहिवासी असून ते भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था, गराडा ता. लाखनी जि. भंडारा येथे जनरल सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराला मुख्याध्यापक, आदीवासी शिव विद्यालय, राजेगाव यांचे सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत पत्राबाबत २४ जून २०२० रोजी पत्र रद्द करण्यासाठी प्रभारी शिक्षणाधिकारी दिलीप पतीराम वाघाये यांनी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथील पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे अयोजन केले असता त्यामध्ये आरोपी प्रभारी शिक्षणाधिकारी दिलीप पतीराम वाघाये यांनी तक्रारदारास मुख्याध्यापक, आदिवासी शिव विद्यालय, राजेगाव यांचे सेवानिवृत्ती प्ररणाबाबत दिलेल पत्र रद्द करण्यासाठी ५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रूपये लाच रक्कम शिक्षणाधिकारी यांचे कक्षात पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून त्यांचविरूध्द पोलिस स्टेशन भंडारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्यये गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रभारी शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांच्या घराची झडती घेणे सुरू आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेश चाटे, पोलिस निरीचक योगेश्वर पारधी, कर्मचारी सहा. फौज. गणेश पडवार, पो.हवा. धनंजय कुरंजेकर, पो.ना. सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राउत, कोमलचंद बनकर, सुनिल हुकरे, कुणाल कढव, संदिप पडोळे आणि चापोना, दिनेश धार्मीक यांनी केली.

Previous articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कारंजा जिल्हा वाशिम च्या वतीने कारंजा शहरातील कोरोना योद्धांचा सन्मान
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस महिला ग्रामीण अकोट च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न