गोंदियात अनेक दुकानावर चालला बुजडोजर, नगर परीषदेची ची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. व्यापारीवर्गात नाराजगी…।।

0
126

 

सचिन श्यामकुंवर सहायक जिल्हा प्रतिनिधि दखल न्यूज भारत…।।

:- गोंदिया नगर परिषदेने आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. शहरातील फुलचूर नाक्या पासून जयस्तंभ चौक, नेहरू चौक, ते मरारटोली टी पाईंटपर्यत रस्त्यालगत अनेक व्यावसायीकांनी थाटलेल्या अतिक्रमित दुकानावर बुलडोजर चालवून अतिक्रमण हटविले.
गोंदिया नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम ही शहरवासीयांसाठी एक चर्चेचा विषय झाला आहे. नगर परिषदेने आत्तापर्यंत एकही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली नाही. सर्व मोहीमा या अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच नगर परिषदेने आज बुधवार पासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. जयस्तंभ परीसरातून अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात करण्यात आली. ही मोहीम नगर परिषद स्वच्छता विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभागाने राबविली. विशेष म्हणजे नगर परिषदेने सुरू केलेल्या या कारवाईचा काही नगरसेवकांनी विरोध केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही मोहीम सुध्दा अर्ध्यावरच बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही दुकानदारांनी सुध्दा या नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे आमचे दुकान बंद करुन नगर परिषदेला काय मिळणार आहे असे सांगत या मोहीमेचा विरोध केला. शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने आतापर्यंत अनेकदा मोहीम राबविली. मात्र या सर्व मोहीम अर्ध्यावरच बंद पडल्या आहेत…