वॉल पेंटिंगच्या माध्यमातून केकतउमरा येथे केली जातेय कोरोना जनजागृती नेहरू युवा मंडळ व राजा प्रसेनजीत संस्थेचा पुढाकार

0
177

 

प्रतिनिधी / आशिष धोंगडे

वाशिम(प्रतिनिधी)दि
21.युवा कार्यक्रम एवंम खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र वाशिम *संलग्नित* नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ व राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक संस्था केकतउमरा.यांच्या वतीने ग्राम केकतउमरा येथे कोरोना व्हायरस,कोविड -19 वॉलपेंटिंगच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोरोना बचाव जनजागृती संदेश नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम,नेहरू युवा मंडळ व संस्था अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर,व नेहरु युवा बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून गांवात असलेले सरकारी कार्यालय भिंत,व सार्वजनिक ठिकाणी जनतेला कोरोना बाबत बचाव,काळजी कशी घ्यावी,अनावश्यक घराबाहेर पडू नये,सॅनिटायझर चा वापर नियमित करा,मास्क बांधून सुरक्षित अंतर ठेवावे,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका,प्रशासनाला सहकार्य करा.असे विविध कोरोना बचावात्मक संदेश भिंतीवर दर्शनीय भागावर रंगवून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादूर यांनी दिली आहे.यावेळी नेहरू युवा मंडळाचे सदस्य विक्की पट्टेबहादूर,दीपक पट्टेबहादूर,पवन पट्टेबहादूर यांचेसह अनेकजण ही कोरोना जनजागृती बचावात्मक वॉलपेंटिंग संदेश बाबत सहकार्य करीत आहेत.

जिल्हा प्रतिनिधी
आशिष धोंगडे
दखल न्यूज भारत