दोन अवैध देशी दारु विक्रेत्यास पकडले, खल्लार पोलीसांची कारवाई

303

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील सलाम पॉईंट येथे दोन अवैध देशी दारु विक्रेत्यांना खल्लार पोलिसांनी काल 21जुलैला संध्याकाळच्या सुमारास पकडले
खल्लार पो स्टे हद्दीतील सलाम पॉईंट येथे लांडी येथील योगेश विश्वनाथ इंगळे वय 30 वर्ष हा नायलॉन थैलीत 15 देशी दारुच्या पावट्या किंमत 900 रुपये घेऊन जात असताना त्यास पकडले
तर दुसऱ्या घटनेत साखरी येथील विनोद बाबाराव सिरसाट हा सलाम पॉईंट वरुन साखरीकडे 12 देशी दारुच्या पावट्या किंमत 720 रुपये घेऊन जात असताना पकडले या दोघांविरुध्द खल्लार पोलिसांनी 65 (ई)नुसार गुन्हा दाखल केला असुन हि कारवाई ठाणेदार अभिजित अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक सावरकर, राजु विधळे, राजेंद्र देशमुख, शाकीर शेख, अविनाश ठाकरे यांनी केली आहे