खळबळजनक बातमी, चिखलगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्यात

1065

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरानजीक असलेल्या चिखलगाव येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
राकेश रामकीशन लोहबडे(30)रा.चिखलगाव असे म्रुतकाचे नाव आहे. राकेश याने दि.21जुलैला दुपारी 3 ते 7 वाजताचे दरम्यान आपले राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली.यावेळी त्याची पत्नी घराबाहेर असल्याचे बोलले जात आहे.राकेश ला दोन चिमुकले मुले असुन त्याच्या वडीलाचा 15 दिवसापुर्वी चिखलगाव येथिल बस स्टँड परिसरात एका कचर्याच्या ढिगार्यावर म्रुत्युदेह आढळुन आला होता. राकेश ने आत्महत्या का केली? याची माहिती मात्र कळु शकली नाही.आज दि.22 जुलै ला वणी ग्रामिण रुग्णालयात त्याच्या म्रुत्यु देहाचे शवविच्छेदन करुन शव नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले होते. त्यानंतर चिखलगाव येथे राकेश च्या म्रुत्युदेहावर अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. पुढिल तपास वणी पोलीस करित आहे.