तरुणांनो नोकरीसाठी वेळ न घालवता स्वतः व्यवसायिक व्हा : आ. सहसराम कोरोटे फायनान्स बडी टॅक्स सोल्युशन प्रतिष्ठानचे उद्धाटन संपन्न

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

गोंदिया : तरुणांनी नोकरीसाठी वेळ न घालवता स्वतः व्यवसायिक होऊन इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी करण्याची गरज आहे.
ग्रामीण क्षेत्रात नेहमीच रोजगाराची गरज असते. अशा परिस्थितीत करून वाढ लिहिणे स्वतः निर्मितीकडे भर देऊन इतरांना रोजगार देण्याच्या कार्य केले पाहिजे. सालेकसा सारख्या ग्रामीण क्षेत्रात आयकर आणि अकाउंट संबंधित सेवा पुरवण्याचे कार्य फायनान्स बडी संस्थानाच्या माध्यमातून केले जात आहे. ही इतर तरुणांसाठी प्रेरणादायी बाब असून तरुणांनी यातून प्रेरणा घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करून स्वतःची व देशाची आर्थिक स्थिती बळकट करण्याचे कार्य करावे, असे विधान आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.
आयकर जीएसटी उद्योग आधार गोमास्ता पीएफ इत्यादी कामांसाठी आमगाव आणि गोंदीयांचे चक्करे लावावे लागत होती. मात्र आता सालेकसा सारख्या ग्रामीण क्षेत्रात या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी प्रतिष्ठानचे नवीन उके, रोहित बनोठे, आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा कटरे, यादनलाल बनोठे, राजू जैन, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश त ठाकरे, शैलेश बहेकार, राजेंद्र बनोठे, झमाल उके, जितेंद्र गणवीर व इतर मान्यवर उपस्थित होते.