Home रत्नागिरी सचिन कात इंडस्ट्रीज सावर्डे मधील चोरी उघड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

सचिन कात इंडस्ट्रीज सावर्डे मधील चोरी उघड; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

254

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

चिपळूण : सचिन कात इंडस्ट्रीज सावर्डे येथील जुन्या ऑफिसच्या तिजोरीतून ६ लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना १५ जुलै रात्री ते १६ जुलै सकाळी १० वा. चे मुदतीत घडली होती. याबाबत सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात सचिन सदाशिव गुरव यांनी दिलेल्या फिर्यादनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस तपास सुरु होता. त्यानुसार नमूद घरफोडी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासने यांनी तात्काळ एक पथक तयार करून सदराचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना व मार्गदर्शन केले.
सदर पथकाने सचिन कात इंडस्ट्रीज येथे कामाला असलेल्या १५० कामगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे कात इंडस्ट्रीज मध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्हातील संशयित आरोपी अजय दिपक मोहिते (वय- २५ , आरवली, बौध्दवाडी, चिपळूण) याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातून गुन्ह्यात चोरुन नेलेले ६,००.००० /- रु. रोख रक्कम, सक, बर्ग मैन टू व्हीलर मोटार सायकल, आधारकार्ड व मोबाईल इन्डसेट असा एकूण ७,००,६५०/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नवनाथ ढवळे , पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासने, स.पो.नि. श्री. चंद्रकांत लाड, पो.हेडकॉ. संदिप कोळंबेकर , संजय कांबळे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, पो. ना. विजय आंबेकर , सागर साळवी, दत्ता कांबळे, उत्तम सासवे यांनी केलेली आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleसावंगी पोलिस चौकीतील रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी कुमरे साहेब यांच्या हस्ते मच्छर दाणीचे वाटप
Next articleकन्हानचा एक भाजीपालावाल्याचा कोरोनाने मुत्यु आज ११रूग्ण ची वाढ कन्हान एकुण ४२रूग्ण, एकाचा मुत्यु. कन्हान क्षेत्रा ची चितां वाढली जनता कर्फुची मागणी जोर धरू लागली.