सावंगी पोलिस चौकीतील रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी कुमरे साहेब यांच्या हस्ते मच्छर दाणीचे वाटप

0
281

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

सावंगी- आज दि. 22/07/2020 रोजी सावंगी गावालगत गडचिरोली- भंडारा जिल्ह्याची सीमा असलेल्या पोलीस चौकीमध्ये रात्रंदिवस आपली ड्युटी करत असलेले पोलीस बांधव आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिषेक कुमरे साहेब, यांच्यातर्फे मच्छर दाणीचे वाटप करण्यात आले. पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. प्रसंगी नागरिकांचा मनस्ताप सहन करतात. तर आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आपलं कर्तव्य बजावताना त्यांच्याकडून आरोग्याकडे अनपेक्षितपणे दुर्लक्ष करतात त्यासाठी नागरिकांसाठी सेवा देणाऱ्यांची काळजी घेत आरोग्य अधिकारी कुमरे यांनी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना मच्छर दाणीचे वाटप केले. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक कुंभारे, आरोग्य सहायक वालदे, आरोग्य कर्मचारी करपे, मेश्राम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.