छोट्या व्यापाऱ्यांचा मुद्रा लोन कर्ज शेतकऱ्यांच्या धर्तीवर माफ करावे पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांची मागणी

0
171

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक /
अश्विन बोदेले
प्रतिनिधी दखल न्यूज भारत

आरमोरी:दि22जुलै – शेतकऱ्यांच्या धर्तीवर छोटे व्यापारांचा मुद्रा लोन कर्ज माफ करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांनी पत्राच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात covid-19 ची परिस्थिती भयावह असल्यामुळे 21 मार्च 2020 पासून देशात लॉक डाऊन सुरू झाले. लॉक डाऊन मुळे छोटे-मोठे व्यापार बंद पडले. काही छोटेमोठे उद्योग ही बंद पडले.
जसे की, ब्युटी पार्लर, छोटे किराणा, स्टेशनरी, आणि इतर व्यवसाय बंद स्थितीत आहेत. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर व्यावसायिकांनी मुद्रा लोन घेऊन व्यवसाय सुरू केले होते परंतु लॉक डाऊन असल्यामुळे व्यवसाय बंद पडले. परिणामी कर्ज घेतलेल्या छोट्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
त्यांचे मुद्रा लोन चे हप्ते थकीत पडल्यामुळे बँक मॅनेजर त्यांना मुद्रा लोन चे हप्ते भरण्यास सांगत असल्याने आजच्या परिस्थितीत मुद्रा लोन घेणारे छोटे व्यावसायिक कर्जाचे हप्ते भरू शकत नाहीत. या परिस्थितीचे भान ठेवून जसे शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ केले . त्याचप्रमाणे छोटे व्यावसायिकांचे दोन लाखापर्यंतचे मुद्रा लोन कर्ज माफ करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांनी केली आहे.