पाच हजार कुटुंबाला आर्सेनिक गोळ्याचे वाटप:- आरोग्य सभापती परदेशी यांचा उपक्रम

114

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

पंढरपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून यावर मात करण्यासाठी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांच्या वतीने कंटेनमेंट झोनमधील व इतर पाच हजाराहून अधिक कुटुंबांना आर्सेनिक 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
काही दिवसापुर्वी सुरक्षीत असणाऱ्या पंढरपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे.प्रशासन व आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना करत आहे. कोरोनाची साखळी शोधण्याचा व तोडण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल व त्यांनी शासनाचे नियमाचे पालन केले तर निश्चितच कोरोना पासुन आपला बचाव होइल असे सभापती परदेशी यांनी सांगितले. जेव्हा प्रॉपर पंढरपूर मधील पहीला रुग्ण कोरोना बाधीत आढळला, त्यावेळी तातडीने काळा मारुती चौक जवळीक कंटेनमेंट झोन मध्ये सभापती परदेशी यांनी वतीने आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधाची सविस्तर माहिती देण्यात आली व घरोघरी औषधे देण्यात आली. पंढरपुरातील बरेचसे कंटेनमेंट झोन मध्ये नगरसेवकांंच्या वतीने, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टरांच्या वतीने प्रशासनाच्या सहकार्याने औषधे, काढा देण्यात येत आहे, असे कंटेनमेंट झोन वगळुन इतर ठिकाणी आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आरोग्य विभाग, नगरपालिकेचे झोनल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाने उपलब्ध होईल तशी आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथिक औषधे देण्यात येत आहेत. आज परियंत गजानन नगर, गणेश नगर, येळे वस्ती, अंबाबाई पटांगणा कडील काही भाग, रोहिदास चौक येथील दोन झोन व शिंदेशाही लिंक रोड, रेल्वे कॉलनी या सर्व कंटेमेंट झोन मध्ये आर्सेनिक अल्बम ३० औषध देण्यात आली तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी मित्र परिवार, सफाई कर्मचारी, रॉबीन हुड आर्मी यांना ३ रा महीन्याचा औषध देण्यात आले, पेट्रोल पंप वरील कर्मचारींना, आशा ताइ कर्मचारी, पोलीसांच्या मदतीला धाउन आलेले कोव्हीड वॉरिअर व प्रभाग क्रं १६ मधील रहीवासी पदमावती वसाहत ते परदेशी नगर ते माळी वस्ती या पुर्ण भागात घरोघरी औषध देण्यात आले.
पंढरपुरातील नामवंत होमिओपॅथीक डॉक्टर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सभापती परदेशी यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० देण्यात आले. आजुन उपलब्धते नुसार, मार्गदर्शन नुसार आत्यावश्यक भागात औषध देण्यात येणार आहे. या मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला निश्चितच मदत होइल असे डॉ देशमुख यांनी सांगितले.
आत्ता आपल्याला कोरोनाच्या संकटा बरोबर साथीच्या आजारावर ही मात करायची आहे. त्यामुळे चांगली जिवन शैली असणे आवश्यक आहे. वेळेवर झोपणे, पुरेशी झोप घेणे, सकाळी व सायंकाळी १० मिनीटे व्यायाम, प्राणायाम, योगासन, मेडीटेशन नियमित करावे असे सुचवले व ताजे अन्न ग्रहण करावे, जड अन्न टाळावे, मोबाईल चा वापर सतत करु नये. कोरोना सोडुन इतर बातम्या, चांगल्या मालिकाही पहाव्यात.अशा प्रकारे काळजी घेतल्यास व कोरोना साठी शासनाने दिलेल्या सुचनेचे पालन केल्यास मला खात्री आहे निश्चितच आपण या संकटातुन बाहेर पडु असे सभापती परदेशी यांनी सांगितले. तसेच कंटेमेंट झोन मध्ये नागरिकांचे थर्मल मशीनच्या माध्यमातून तपासणी होत आहे, कोमॉरबीड नागरिकांची पल्सऑक्सिमिटर माध्यमातून तपासणी होत आहे. जेष्ट नागरिक व लहान मुलांकडे प्रशासनाचे विषेश लक्ष आहे तसेच नगरपालिकेच्या वतीने निरजंतुकिकरणासाठी आत्याधुनीक सोपीया २०० या होमिओपॅथीक औषधाची फवारणी ही करण्यास सुरवात केली आहे. यामुळे कंटेमेंट झोन जास्त कालावधी करिता निर्जंतुक होण्यास मदत होइल असे आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सांगीतले.