राजुर येथिल पाँझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील कुंभा येथील तीन जन मारेगाव येथे कॉरंटाइन

 

मारेगाव तालुका प्रतिनिधी /रोहन आदेवार

दि.२२

वणी तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथे राहणा-या महिलेवर हृद्यरोगासंबंधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. बाहेरून रुग्ण आल्यावर नागपूरमध्ये आधी कोरोनाची चाचणी घेतली जाते. त्यानुसार तिथे डॉक्टरांनी त्या महिलेची कोरोनाची चाचणी घेतली. त्यात ती महिला पॉजिटिव्ह आढळून आली. महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह येताच याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. दरम्यान,तत्पूर्वी मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील नातेवाईक प्रकृती पाहण्यास गेल्याने मारेगाव येथे तिघांना कॉरंटाइन करण्यात आले आहे.
सध्या प्रशासनाने रुग्ण राहत असलेला १५० मीटर पर्यंतचा परिसर सील केला असून रुग्णाच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना परसोडा येथील कॉरन्टाईन सेन्टरमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातच त्यांच्या संपर्कात आलेल्या  कुंभा येथील तीन जणांना मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेच्या कॉरन्टाईन सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले.

परिणामी ,मारेगाव तालुक्यातील १५ किमी.अंतरावर असलेल्या कुंभा गावातील जनते मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्ण या रुग्ण त्याच्या नातेवाईक असल्याने काही दिवसा पूर्वी त्यांची प्रकृती पाहण्यास गेले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. गावामधे मात्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.अवघ्या काही अंतरावर कोरोनाचा शिरकाव झाल्याने मारेगावकरात भितीचे सावट पसरत आहे.

ग्रामीण भागातील चिंता वाढली…

वणी जवळील राजूर (कॉलरी) या गावात अचानक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावासह वणी व मारेगाव तालुक्यातही खळबळ उडाली आहे.तेली फैल येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वणी जवळ असलेल्या मारेगाव तालुक्यात चांगलीच चिंता वाढली आहे. राजूर पासुन अवघ्या दहा कि.मी. अंतरावर असलेल्या मारेगाव सह कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव होवू नये म्हणून जनतेनीच काळजी घ्यावी.कामानिमित्तच बाहेर पडावे.सोशल डिस्टन्स ठेऊन मास्क वापरावा अशी प्रशासना कडुन सुचना करण्यात येत आहे.