चिपळुणात कोरोना योद्धाला मारहाण, 108 ॲम्बुलन्स ड्रायव्हर उद्यापासून बंद पुकारणार

0
231

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

चिपळूण : काल दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे अपघात ग्रस्त युवकाला घेण्यासाठी 108 ॲम्बुलन्स ड्रायव्हर पोहोचला, अपघातग्रस्त युवकाला गाडीमध्ये भरून नेत असताना मार्गताम्हाणे येथील दोघांनी ड्रायव्हर संजीवन गमरे राहणार खोपड बौद्धवाडी याला मारहाण केली, पंचनामा होण्यापूर्वी अपघातग्रस्ताला नेऊ नये असे सांगत दोघांनी गमरे यास जबर मारहाण केली, तरीही अंबुलन्स ड्रायव्हर गमरे याने संबंधित अपघातग्रस्ताला कामथे येथील रुग्णालयात दाखल केले,
या मारहाण विरोधात चिपळूण, मंडणगड, दापोली, गुहागर आणि खेड येथील 108 ॲम्बुलन्स ड्रायव्हर एकत्र आले असून त्यांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
मारहाण करणारे मार्गताम्हाणे येथील सुधीर (गोट्या) चव्हाण, सतीश (बाबल्या) चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास 108 एम्बुलेंस ड्रायव्हर उद्यापासून बंद पुकारणार आहेत, कोविड काळामध्ये ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांना कोरोना योद्धांची उपमा देण्यात आली मात्र आता रुग्ण सेवा देत असताना आम्हाला मारहाण होत असेल तर 108 ऍम्ब्युलन्स चालक सहन करणार नाही असे मत चिपळूण, खेड आणि गुहागरच्या 108 ॲम्बुलन्स ड्रायव्हरनी व्यक्त केलय.

दखल न्यूज भारत