मल्टी ऑर्गेनिक कंपनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा युवा सेनेची मागणी

958

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपुर एम.आय.डी.सी येथील मल्टी ऑर्गेनिक प्रायवेट लिमिटेड या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना करोना ची लागण होत असल्यामुळे आणि सतत करोणा पॉझिटिव रुग्ण अजूनही येत असल्याने युवा सेना तालुका चंद्रपुर च्या वतीने सदर कंपनी प्रतिबंध क्षेत्र करण्यात यावे याकरिता युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी सदर कंपनीला निवेदन देऊन मागणी केली आहे. येत्या चार दिवसात जर कंपनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित न केल्यास कंपनीला धडा शिकवन्याचा तसेच मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवा सेनेचे कार्यकर्ते महेश शेंडे ,चेतन बोबडे, कोमल ठाकरे, अमित चिकणकर, सद्दाम कनोजे, सचीन घागरगुंडे, गौरव राय, ज्ञानेश्वर लोनगाडगे, शुभम घागरगुंडे, विनोद महाकुलकर, जावेद शेख, निलेश वांढरे, योगेश जंगले, सुश्मित गौरकार, अजय मादेश्वार, मयुर वाभिटकर, चेतन कामडी, अपील शेरखी, अनिश शेख, विशाल खोबरागडे , स्थानिक गावकरी व युवा सेना सैनिक तसेच शिवसैनिक उपस्थित होते.